Indigo Team Lokshahi
ताज्या बातम्या

दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखलं; इंडिगोला 5 लाखांचा दंड

रांची विमानतळावर ही घटना घडली आहे.

Published by : Sudhir Kakde

नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगो या विमान कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कंपनीच्या ग्राउंड स्टाफने रांची विमानतळावर एका अपंग मुलाला हैद्राबादला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मुलाच्या पालकांनीही विमानात न चढण्याचा निर्णय घेतला. ही घटना 07 मे रोजी घडली. रांची विमानतळावर रांची-हैद्राबाद फ्लाइटमध्ये चढण्यापासून थांबवल्यानंतर, इंडिगोकडून सांगण्यात आलं आहे.

हवाई प्रवासासाठी देशातील सर्वोच्च नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हटलं आहे की, तपासणीत असं आढळून आलं आहे की "इंडिगो ग्राउंड स्टाफला अपंग मुलाची काळजी घेता आली नाही, तसंच मुलाला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखलं, त्यामुळे परिस्थिती जास्त संवेदनशील झाली.

"ग्राउंडच्या कर्मचार्‍यांना मुलाला व्यवस्थित वागणूक देऊन परिस्थिती नियंत्रणात आणता आली असती, मुलाला शांत करून, त्याला बोर्डिंग नाकारले गेले नसते तर अशी अडचण निर्माण झाली परिस्थिती उद्भवली नसती," असं एका निवेदनात म्हटलं आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय