Loksabha Election 2024 
ताज्या बातम्या

Loksabha Election 2024 Result: कोण मारणार बाजी? इंडिया आघाडी की महायुती? आजच्या निकालाकडे लागलं संपूर्ण देशाचं लक्ष

इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचा आजचा निकाल पाहण्याची देशभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Published by : Naresh Shende

Loksabha Election 2024 Result : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडलीय. इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचा आजचा निकाल पाहण्याची देशभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली असून ८ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे.

लोकसभेच्या सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला मिळणार? देशातील जनतेचा कौल इंडिया आघाडीला मिळणार की महायुतीला? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. निवडणुकांची सांगता झाली आहे. पण आता सर्वांना निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. हा निकाल आज ४ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेत्यांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. एक्झिट पोलमध्ये राजकीय विश्लेषक आणि विविध संस्थांनी आकडेवारीचे जे अंदाज बांधले आहेत, ते कितपत खरे ठरतात, हे पाहणंही ओत्सुक्याचं ठरणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी