ताज्या बातम्या

साहेबांच्या ब्रिटनवर भारतीयांचं राज्य! ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथमच भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी निवड झाली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथमच भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी निवड झाली आहे. सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी औपचारिक घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी सुनक यांचे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले.

ब्रिटनमध्ये आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान पदी विराजमान झाल्याने एक नवा इतिहास रचला गेला आहे. ब्रिटनने भारतीयांना 150 वर्षे गुलाम बनवून ठेवले, ते ब्रिटन आता एक भारतीय चालवणार आहे. याशिवाय युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बनणारे ते आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती देखील आहेत. ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीने दिवाळीच्या दिवशी ऋषी सुनक यांची नेता म्हणून निवड केली.

पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसांतच राजीमाना दिल्याने भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पंतप्रधानपदावर दावा होता. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुनक, बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डंट यांचा समावेश होता. परंतु, जॉन्सनने माघार घेतली आणि पेनीला आवश्यक पाठिंबा मिळू शकला नाही. व ते शर्यतीतून बाहेर पडले आणि सुनक ब्रिटनचे पहिले आशियाई पंतप्रधान होण्याचे निश्चित झाले.

ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत सामान्य माणसांवरील महागाईचा ताण कमी करणे हा मोठा अजेंडा बनला होता. अशा परिस्थितीत लिझ ट्रस मोहक आश्वासने देऊन पंतप्रधान झाल्या. पण, त्यांचा कृती आराखडा फसला. आता सुनक यातून सर्वसामान्यांची कशी सुटका करतात हे पाहावे लागेल. ऋषी सुनक हे आजपासूनच अधिकृतपणे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी ऋषी सुनक यांचे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदनापर ट्विट केले. ऋषी सुनक यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुम्ही यूकेचे पंतप्रधान बनणार आहात. मी जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास उत्सुक आहे. ब्रिटीश भारतीयांचा 'व्हायब्रंट ब्रिज'. दिवाळीच्या विशेष शुभेच्छा तुमच्यासाठी. आम्ही ऐतिहासिक संबंधांचे आधुनिक भागीदारीत रूपांतर केले आहे, असे माोदींनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, ऋषी सुनक यांनी पहिल्यांदा 2015 मध्ये संसदेची निवडणूक जिंकली होती. अवघ्या सात वर्षांत ते आज पंतप्रधान होणार आहेत. बोरिस जॉन्सन मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेले ऋषी सुनक यांनी पंतप्रधान झाल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय