गेल्या काही दिवसांपासून उत्तर मध्य मुंबईच्या लोकसभेच्या जागेबाबत महाविकास आघाडीत तिढा कायम होता. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर न झाल्यानं वर्षा गायकवाड नाराज होत्या. त्यांनी दिल्लीवारी करून काँग्रेस हायकमांडची भेटही घेतल्याच्या चर्चा होत्या. शिवसेना ठाकरे गट या जागेबाबत इच्छूक होता. अशातच आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून काँग्रेसने उत्तर मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर केलीय. मी स्वत:च्या उमेदवारीसाठी गेले नव्हते. दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात माझा मतदारसंघ आहे. मुंबईत याबाबत आम्ही चर्चा केली होती. आमचं मत सांगण्यासाठी दिल्लीत गेले होते, असं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड लोकशाहीशी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी लोकशाहीला प्रतिक्रिया दिली, गायकवाड यावेळी म्हणाल्या, पक्षाचे खूप आभार मानते. मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी मला संधी दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला संधी दिली, त्याबद्दल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचंही धन्यवाद मानते.
या जागेबाबत तिढा कायम होता, त्यामुळे तुम्ही दिल्लीवारी केली होती, यावर बोलताना गायकवाड म्हणाल्या, मी स्वत:च्या उमेदवारीसाठी गेले नव्हते. दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात माझा मतदारसंघ आहे. मुंबईत याबाबत आम्ही चर्चा केली होती. आमचं मत सांगण्यासाठी दिल्लीत गेले होते. पक्षाचा आदेश घेऊन मुंबईत कामाला सुरुवात केली होती. पक्षाने मला मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष बनवलं. मंत्रिपदही दिलं. आताही मला संधी दिल्यानं लोकांनी मला आशीर्वाद द्यावा, असंही गायकवाड म्हणाल्या. तसच वर्षा गायकवाड यांन ट्वीट करत म्हटलंय, एकत्र लढणार आणि जिंकणार. देशाचं संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे. आम्ही एकत्र लढू आणि या निवडणुकीत जिंकू. आम्ही एकत्र आहोत, त्यामुळे ही परिस्थिती बदलून टाकू.
वर्षा गायकवाड गेल्या काही दिवसांपारून नाराज होत्या. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचं काम आता काँग्रेसनं केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडूनही या जागेसाठी मागणी करण्यात आली होती. परंतु, काँग्रसने ही जागा शिवसेनेला सोडली नाही.