ताज्या बातम्या

जम्मू व काश्मीर, हरियाणात 'इंडिया'? मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज

Published by : Dhanshree Shintre

हरियाणा आणि जम्मू व काश्मीरमध्ये मतदारांनी ‘इंडिया’ महाआघाडीला कौल दिला असल्याचे मतदानोत्तर चाचण्यांमधून दिसून आले. दोन्ही विधानसभांसाठी मतमोजणी मंगळवारी, 8 ऑक्टोबरला होणार आहे. दोन्हीकडे सदस्यांची संख्या 90 इतकी असून बहुमतासाठी 46 जागा आवश्यक आहेत.

हरियाणातील मतदान संध्याकाळी सहा वाजता संपल्यानंतर विविध माध्यमे आणि वृत्तवाहिन्या मतदानोत्तर चाचण्यांचा निकाल जाहीर केला. त्यापैकी हरियाणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दैनिक भास्करचा अपवाद वगळता जवळपास सर्वच चाचण्यांमध्ये काँग्रेसला 50 पेक्षा जास्त जागा मिळतील असे दिसत आहे. तर, भारतीय राष्ट्रीय लोकदलाला जननायक जनता पक्षापेक्षा जास्त जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे.

तब्बल 10 वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक होत असलेल्या जम्मू व काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता दिसत आहे असे असले तरी, जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि काँग्रेसच्या आघाडीला भाजपपेक्षा जास्त जागा मिळतील असाच सर्व मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज आहे. इंडिया आघाडीच्या या घटक पक्षांमध्ये एनसी काँग्रेसपेक्षा आघाडीवर असेल असेही दिसून येत आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष (पीडीपी) 5 ते 12 मतदारसंघांमध्ये विजयी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर अपक्षांसह इतरांना 4 ते 16 जागा मिळतील असे या चाचण्यांमधून दिसत आहे.

Hiraman Khoskar Meet Sharad Pawar |काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी घेतली पवारांची भेट; कारण आलं समोर

चुलत्यावर टिका तर पुतण्याबरोबर गुप्तगू; आमदार रोहित पवारांचा नाव डाव

मुंबईचा तब्बल 27 वर्षांनंतर इराणी चषकावर कब्जा; पहिल्या डावातील आघाडीमुळे विजयी घोषित

Sambhajiraje Chhatrapati : अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला चला, संभाजीराजे छत्रपती, कार्यकर्त्यांसह गेटवे ऑफ इंडिया येथे धडकणार

Chembur: मुंबईतील चेंबूर (पूर्व) येथील सिद्धार्थ कॉलनीमध्ये अग्नितांडव