आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत. सकाळी 10.15 वाजता कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी देतील. सकाळी 11 वाजता लोकसभेत बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार, करदात्यांना दिलासा मिळणार का, रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीत कोणत्या घोषणा होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही संसद भवनात पोहोचले असून ते येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची पूर्व अर्थसंकल्पीय बैठक पार पडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बजेटला मंजुरी मिळाली आहे. अर्थसंकल्प चांगला असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.