इंडिया आघाडीची १ जून रोजी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभेचा संभाव्य निकाल आणि पुढची रणनीती या बाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या बैठकीसाठी शरद पवार, नाना पटोले, जयंत पाटील तसेच अन्य लहान घटक पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे परदेशात आहेत आणि ते 1 जूनच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नाही आहे.