हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. बीडमधील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.
बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर बाळासाहेब शिंदे थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले. त्यानंतर त्यांना बीड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय.
दरम्यान, बाळासाहेब शिंदे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते