attari wagah border : भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. पंजाबमधील अमृतसरच्या अटारी-वाघा सीमेवर बीटिंग द रिट्रीट सेरेमनी आयोजित करण्यात आली होती. यावेळी बी.एस.एफ. सैनिकांनी चमकदार कामगिरी केली. यावेळी उपस्थित सर्वांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केले. तसेच लोक देशभक्तीपर गाण्यांवर नाचताना दिसले. (independence day soldiers showed enthusiasm during beating the retreat ceremony at attari wagah border watch video)
अटारी सीमेवर बीटिंग रिट्रीट सेरेमनी 1959 मध्ये सुरू झाली होती. बीटिंग द रिट्रीट संघर्षाच्या वेळी सौहार्द आणि सहकार्य दर्शवते. या दरम्यान भारत आणि पाकिस्तान देशांचे सैनिक संचलन करतात. या निमित्ताने बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये हा सोहळा होतो.