ताज्या बातम्या

Independence Day : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये, संस्था, दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले असून यावेळी राष्ट्रगीत झाल्यानंतर लाल किल्ला परिसरात हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील महत्त्वाचे नेते आणि परदेशी पाहुणेदेखील उपस्थित आहेत.

लाल किल्ल्यावर पोहोचण्याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. तर, पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरुनही देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने