देशभरात आज ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्या दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात नुकतेच पार पडले.
यावेळी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस चांगला असला तरी, पिकांना जेवढा पाऊस हवा होता, तेवढा मिळाला नाही. आज देखील आपल्या राज्यातील काही भागात टॅकरने पाणी पुरवावे लागत आहे.
माझा शेतकरी, कष्टकरी वाचला पाहिजे म्हणून सरकार सातत्यानं लक्ष ठेवून आहे. कांदा उत्पादकांसाठी सरकारनं साडेपाचशे कोटी मंजूर केले आहेत. शिवाय, शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीकविमा योजना सुरु केली आहे. जगाच्या इतिहासात अशी योजना कोणीही सुरु केली नव्हती, ती योजना आपण आपल्या राज्यात सुरु केली आहे.
मला नेहमीच कोल्हापूरकरांचा अभिमान वाटत राहिला आहे. मी ज्यावेळी ऊर्जामंत्री होतो, त्यावेळी सगळ्यात चांगल्या पध्दतीनं विजेचा पैसा देणारी सर्वसामान्य जनता कुठली असेल तर ती म्हणजे, कोल्हापूरची. वेळेत परत फेड करणारी लोक इथं आहेत. अतिशय चांगल्या पध्दतीनं योजनांचा वापर करणारी लोक माझ्या कोल्हापुरात आहेत. त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं आहे.