जगासह देशात 2020 मध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला. या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्यापही पूर्णपणे संपेलला नाही. त्यातच आता देशाला पुन्हा टेन्शन वाढवणारी बातमीसमोर आली आहे. देशभरात H3N2 व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नीती आयोगाने ही परिस्थिती बघत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच राज्यांना व्हायरसचा सामना करण्यासाठी रुग्णालये सुसज्ज असतील हे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.
भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. त्यामुळे H3N2 इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्टवर आहे. नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकारे घ्या काळजी?
फ्लूवरील वार्षिक लस घ्या.
हात नियमितपणे स्वच्छ धुवा. विशेषत: टायलेट नंतर, जेवणाआधी तसेच चेहरा किंवा नाकाला स्पर्श करण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा.
शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
आजारी व्यक्तींपासून दूर राहा.