मुंबईच्या सातही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. धरणांमधील पाणीसाठा पोहोचला 43 टक्क्यांवर पोहचलेला पाहायला मिळत असून 15 दिवसांच्या पावसाने पाणीसाठा 38 टक्के वाढला असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईच्या तलावात 43 टक्के पाणीसाठा आहे. मुंबईकरांची 6 महिन्यांची पाणीटंचाई मिटेल इतका पाणीसाठा आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास लवकरच पाणीकपात रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.