धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाणीसाठ्यात वाढ झाल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
105.25 टिएमसी साठवण क्षमता असलेले धरण पूर्ण भरलेले असून धरण शंभर टक्के भरलेल आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.
थोड्याच वेळात 39 हजार 627 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 9 वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे कोयना सिंचन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.