कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशभरात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूचे ३,०१६ रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी राज्यात कोरोनाचे ६९४ नवीन रुग्ण आढळले.
राज्यातील कोरोनाच्या दैनंदिन आकडेवारीत ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.सुमारे सहा महिन्यांहून अधिक काळ नियंत्रणात राहिलेल्या करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाबाधितांचे प्रमाण सोलापूरमध्ये २०.०५ टक्के, तर सांगलीत १७.४७ टक्क्यांवर पोहोचले आहे.
गेल्या 15 दिवसांपासून कोरोना रुग्णात सातत्याने वाढ होत आहे. 22 ते 28 मार्चदरम्यान रुग्णांचं प्रमाण 6.15 टक्क्यांवर पोहचले आहे. मात्र, २२ मार्च ते २८ मार्च या कालावधीत हे प्रमाण ६.१५ टक्क्यांवर गेले. महिन्याभरापूर्वी राज्यात करोनाबाधितांचे प्रमाण १.०५ टक्के होते.