Admin
ताज्या बातम्या

कुरुलकरांच्या अडचणीत वाढ; 'एटीएस'कडून 'पॉलिग्राफ' टेस्टची मागणी; प्रकरण नेमकं काय?

पाकिस्तानी तरुणीने प्रदीप कुरुलकरला हनीट्रॅपमध्ये अडकवून देशातील महत्त्वाची माहिती शत्रुराष्ट्राला पुरवल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पाकिस्तानी तरुणीने प्रदीप कुरुलकरला हनीट्रॅपमध्ये अडकवून देशातील महत्त्वाची माहिती शत्रुराष्ट्राला पुरवल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एटीएसकडून प्रदीप कुरूलकर यांना अटक करण्यात आली आहे. कुरुलकर यांच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांची कोठडी एका दिवसाने वाढविण्यात आली आहे.

अशातच, एअरफोर्सचे वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे हेही हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. कुरुलकर यांच्या संपर्कात असलेली महिलाच निखिल शेंडे यांच्याही संपर्कात असल्याचे समजते आहे. दरम्यान, निखिल शेंडे यांना एटीएसने ताब्यात घेतले असून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

या 'हनीट्रॅप' प्रकरणात तपासादरम्यान नवनवीन धक्कादायक खुलासे करण्यात येत आहे. तसेच कुरुलकरांनंतर आत्तापर्यंत गुप्तचर विभागासह वायुदलाचा अधिकारी अडकला असल्याची माहितीही समोर आली आहे.न्यायालयात एटीएसनं न्यायालयाकडे 'पॉलिग्राफ टेस्ट'ची परवानगी मागितली आहे.सुनावणीवेळी महाराष्ट्र एटीएसनं पॉलिग्राफ टेस्ट परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती