राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.मागील अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के करण्यात आलेला आहे.डीए आणि डीआरएमध्ये ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली. केंद्राने 3 एप्रिल 2023 रोजी महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता.
सरकारने मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरुन 34 टक्के करण्यात आला आहे. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो.