बीबीसीच्या दिल्ली कार्यालयात आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना ऑफीसबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. बीबीसीच्या मुंबई, दिल्लीतील ऑफिसवर छापेमारी करण्यात आली आहे.
आयकर अधिकारी आज बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात पोहोचले आहेत. अधिकाऱ्यांकडून बीबीसीच्या वित्त विभागाच्या खात्यातील काही कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे. आयकर विभागाने विभागाने खाते आणि वित्त विभागातील व्यक्तींचे काही मोबाईल फोन आणि लॅपटॉप/डेस्कटॉप जप्त केल्याचं सुत्रांच्या माहितीनुसार सांगितलं आहेत.
बीबीसी ऑफिसमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोन वापरण्यास मनाई केली आहे. बीबीसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना एका खोलीत एकत्र केलं आहे. दरम्यान सध्या आयकर विभागाची टीम कागदपत्रआंची तपासणी करत आहे. अशी माहिती मिळत आहे.