सुरज दाहाट,अमरावती
बहुप्रतीक्षेत असलेल्या नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या ५२० किमीच्या समृद्धी महामार्गापैकी ४९१ किमीचे काम सध्या पूर्ण झाले आहे. तर उर्वरित २९ किमीचे काम पूर्ण करण्यासाठी किमान दोन महिने लागणार आहे. त्यामुळे समृद्धीचे उद्घाटन आता नव्या वर्षातच होणार आहे. देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.
नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे काम झाल्यानंतर २०२३ मध्ये उर्वरित महामार्ग पूर्ण करून एकूण ७०१ किमीचा महामार्ग खुला होईल. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी महामार्ग सुरू करण्यासाठी वेगाने काम केल्या जात आहे. शिर्डी ते इगतपुरी आणि इगतपुरी ते मुंबई असा एकूण ७०१ किमी काम केल्या जात आहे.पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या समृद्धी महामार्गाच्या ५२० किलोमीटर पैकी ४९१ किलोमीटरचा सिमेंट रस्ता तयार झाला आहे. नागपूर ते सेलू बाजार दरम्यान २१० किलोमीटर आणि मालेगाव ते शिर्डी दरम्यान २८१ किलोमीटरचा रस्ता तयार झाला आहे.
मात्र बुलढाणा जिल्ह्यातील काटेपूर्णा नदीवर केवळ पुलाचे काम सध्या अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग अद्याप पर्यंत सुरू करण्यात आलेला नाही दिवाळी झाल्यावर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होईल असं सांगण्यात आलेलं होतं मात्र अद्याप पर्यंत हा महामार्ग सुरू करण्यात आलेला नाही त्यामुळे नववर्षातच जानेवारीच्या शेवटी या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होईल असं चिन्ह आहे, मात्र अधिकृत रित्या समृद्धी महामार्गाकडून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही,त्यामुळे हा महामार्ग केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा लागलेली आहे