ताज्या बातम्या

वर्ध्यात चार ग्रामपंचायतीत काँग्रेस तर चार ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता

निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष

Published by : Sagar Pradhan

भूपेश बारंगे|वर्धा: जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर झाले आहे. नऊपैकी चार ग्रामपंचायतीत काँग्रेस तर भाजपला चार ग्रामपंचायतीत सत्ता काबीज करता आली यावरच दोन्ही पक्षाला समाधान मानावे लागले.वर्धा तालुक्यातील सालोड आणि बोरगाव (नां.) येथे भाजपची सत्ता आली. आर्वी तालुक्यात सात पैकी चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसची सत्ता आली. दोन ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता असणार आहे. आर्वी तालुक्यात भाजपचे आमदार दादाराव केचे, काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

आर्वी तालुक्यात भाजपने दोन ग्रामपंचायतीत तर काँग्रेसनं चार ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली. आर्वी तालुक्यात निकाल मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने दिला आहे.मागच्या वेळी काँग्रेसकडे दोन ग्राम पंचायत होत्या तर यावेळी दोन ग्राम पंचायत वर्चस्व मिळवता आले. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. कार्यकर्त्यांनी वाजतगाजत विजय साजरा केला.फुलाचा वर्षाव करण्यात आला. आर्वीत कॉंग्रेस विजय मिळाला असता आंनद गगनात मावेनासा झाला होता.तर भाजप मध्ये चेहऱ्यावर निरागसता पाहायला मिळाली.

वर्धा व आर्वी तालुक्यात नऊ गावातील नवनिर्वाचित सरपंच नावे व गट

काँग्रेस गटाकडे

1) मांडला ग्राम पंचायत- सुरेंद्र धुर्वे सरपंच

2) पिपरी ग्राम पंचायत- रज्जक अली सरपंच

3)हैबदपूर (वाठोडा) ग्राम पंचायत - सचिन पाटील सरपंच

4) सर्कसपूर ग्राम पंचायत- गजानन हनवते सरपंच

भाजप गटाकडे

1)नेरी मिरझापुर (आर्वी)ग्राम पंचायत- बाळा सोनटक्के

2)जाम (आर्वी) ग्राम पंचायत- राजकुमार मनोरे

3) सालोड (वर्धा)ग्राम पंचायत- अमोल कन्नाके सरपंच

4)बोरगाव (ना.) वर्धा, ग्राम पंचायत - श्यामसुंदर खोत सरपंच

अहिरवाडा ग्राम पंचायत (आर्वी) -विना संजय वलके सरपंच

भाजपचे आमदार भोयर यांचं दत्तक गाव सालोड इथं भाजपची सत्ता

वर्धा तालुक्यातील सालोड (हिरापूर) हे गाव वर्ध्याचे भाजपचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांचं दत्तक गाव म्हणून ओळखलं जातं.सालोड येथे भाजप गटाकडून सरपंचपदासाठी अमोल कन्नाके मोठ्या मताधिक्क्यानं विजयी झालेत.सतरापैकी पंधरा जागांवर भाजप गटाचे उमेदवार विजयी झालेत.विजयानंतर जल्लोष करण्यात आला.गावातून रॅलीही काढण्यात आली. सालोड येथे भाजप गटाच्या उमेदवारांना मतदारांनी कौल दिलाय.. सालोडमध्ये सरपंचपदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते.तसंच सदस्य पदासाठीही उमेदवार रिंगणात होते.आमदार डॉक्टर पंकज भोयर यांचं दत्तक गाव म्हणून ओळख असल्यानं इथल्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...