संगमनेर तालुक्यातील पठार भागात गेली पाच ते सहा दिवस वरून राजाची कृपा दृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसला. परंतु घारगाव ते कोठे बु, पिंपळदरी या रस्त्यावर आधीच खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यात पाऊस झाल्याने रस्त्यावर चिखल गाळ साचल्याने ये जा करणारे प्रवासी घसरून पडत असल्याची घटना घडू लागल्या आहे. घारगाव कोठे बू.या रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे, वाढलेली झाडे त्यामुळे या रस्त्याला साईट पट्टी देखील राहिली नसल्याचे दिसून येत आहे. या कारणांनी हा रस्ता अरुंद झाला असून दोन गाड्या या रस्त्यावर पास होत नसल्याच्या व्यथा येथील वाहन धारक प्रवासी व्यक्त करत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये गाळ आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने छोट्या वाहन धारकांना मोठ्या खास्ता खात प्रवास करावा लागत असल्याचे दुःख येथील नागरिक व्यक्त करत आहेत.
गेली अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने येथील बस सेवा देखील बंद झाली असल्याचे नागरिक बोलत आहेत. कोठे ते भोजदरी रस्त्याची देखील बिकट अवस्था झाली असून येथील शेतकऱ्यांना डोक्यावर शेतमाल घेऊन गावापर्यंत यावे लागत असल्याचे शेतकरी व्यक्त होत आहे. या सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या कडे मंत्री, आमदार, जि. प.सदस्य, पं. स.सदस्य,अथवा ना ग्रामपंचायत लक्ष देत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तर निद्रेच्या सोंग घेतले की काय असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहे.