Kalyan Police  team lokshahi
ताज्या बातम्या

कल्याणमध्ये 25 लाखांच्या गुटख्यासह तिघांना डीसीपी स्कॉडने ठोकल्या बेडय़ा

डीसीपी स्कॉड आणि खडकपाडा पोलिसांनी गांधारी रोडवर सापळा रचला आणि आरोपींना ठोकल्या बेडय़ा

Published by : Shubham Tate

कल्याण (अमजद खान) : आरोग्यास घातक असलेल्या गुटख्याचा गोरखधंदा जोरात आहे. कल्याणमध्ये डीसीपी स्कॉडने गुटख्याची तस्करी करणा:या तीन जणांना अटक करुन त्यांच्याकडून कंटेनरमध्ये असलेला 25 लाख रुपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. कर्नाटकहून उल्हासनगरला जाणारा हा गुटखा नक्की कोणाचा आहे याचा शोध आत्ता पोलिस घेत आहेत. (Kalyan, three people were handcuffed by DCP Scud with gutka of 25 lakhs)

कल्याण डोंबिवलीत उल्हासनगर आणि अंबरनाथ बदलापूरसह इतर भागात उघडपणो विकला जातो. कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकून गुटखा जप्त करीत त्याची विक्री करणा:या अनेकांच्या विरोधात कारवाई केली आहे. मात्र तरी देखील हा गोरखधंदा सुरुच असल्याचे काही प्रमाणात दिसून येते. शनिवारी रात्री कल्याण डीसीपी स्कॉडचे पोलिस कर्मचारी संजय पाटील अणि ऋषिकेश भालेराव यांना गांधारी रोडवर गुटख्याचा कंटेनर येणार असल्याची माहिती मिळाली. डीसीपी स्कॉड आणि खडकपाडा पोलिसांनी गांधारी रोडवर सापळा रचला आणि भिवंडी पडघा मार्गे कल्याणमध्ये येत असलेला गुटख्याचा एक कंटनेर पोलिसांनी अडविला. त्या कंटेनरमध्ये फो के स्टार हा गुटखा असल्याचे मिळून आले.

या गुटख्याची बाजारातील किंमत 25 लाख रुपये आहेत. पोलिसांनी या गुटख्याची तस्करी करणा:या कंटनेर चालक मशाक इनामदार याला अटक केली आहे. तो कर्नाटक येथील राहणारा आहे. त्याच्यासोबत उल्हासनगरात राहणारा लव सहानी, प्रेमचंद वाठोरे याला देखील अटक केली आहे. या प्रकरणात रजनीकांत गायकवाड याचा पोलिस शोध घेत आहेत. हा गुटखा कर्नाटकहून उल्हासनगरला आणण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती आहे. नक्की हा गुटखा कोण खरेदी करणार होता. त्याची तस्करी कोण करतोय याचा शोध आत्ता पोलिस घेत आहे.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news