ताज्या बातम्या

बिहारच्या औरंगाबादमध्ये छठपूजेचा प्रसाद बनवताना सिलेंडरचा स्फोट; 34 जण जखमी

बिहारच्या औरंगाबादमध्ये शनिवारी (२९ ऑक्टोबर) एक मोठी दुर्घटना घडली. छठ पूजेदरम्यान एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आगीत ३४ जण जखमी झाले.

Published by : Siddhi Naringrekar

बिहारच्या औरंगाबादमध्ये शनिवारी (२९ ऑक्टोबर) एक मोठी दुर्घटना घडली. छठ पूजेदरम्यान एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आगीत ३४ जण जखमी झाले. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. औरंगाबादमध्ये छठपूजेसाठी प्रसाद बनवताना सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली. यामध्ये सुमारे 34 जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात 7 पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ते आग विझवण्यासाठी आले होते, मात्र अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. सर्व जखमींना तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना औरंगाबादच्या शहागंज परिसरातील असून, अनिल गोस्वामी नावाच्या व्यक्तीच्या घरी महिला छठ प्रसाद बनवत होत्या. त्यानंतर सिलिंडरमधून गॅसगळती झाल्याने घराला आग लागली. आगीची माहिती मिळताच आजूबाजूचे लोकही आग विझवण्यासाठी पोहोचले. दरम्यान, माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे गस्ती पथकही तेथे पोहोचले आणि पोलिसांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result