ताज्या बातम्या

अंधेरी, जोगेश्वरीत 'या' दिवशी राहणार 18 तास पाणीपुरवठा बंद

अंधेरी, जोगेश्वरीत पाणीपुरवठा 18 तास बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अंधेरी, जोगेश्वरीत पाणीपुरवठा 18 तास बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या वेरावली जलाशय-2 येथे ७५० मिलिमीटर व्यासाच्या पार्ले वेसावे (वर्सोवा) निगमवाहिनीवरील चार झडपा बदलण्यात येणार आहे.

या कामाच्या पार्श्वभूमीवर अंधेरी, जोगेश्वरीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. येत्या गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून 18 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.गुरुवारी रात्री 8 वाजल्यापासून ते शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या कालावधीत बस्तीवाला कंपाऊंड, अचानक कॉलनी, कलेक्टर कंपाऊंड, सारीपूत नगर, दुर्गानगर, मातोश्री क्लब, महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला मार्ग, एमएमआरडीए वसाहत, गणेश नगर, शोभना परिसर, सुंदर नगर

गौतम नगर, मॉडर्न बेकरी, प्रजापूरपाडा, त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर ए पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी उकळून पिण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

पुणे एअरपोर्टवरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार; 'या' तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

निफाड तालुक्यातील भाजपचे यतीन कदम शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना

पिंपरी-चिंचवडच्या भोसरीत पाण्याची टाकी कोसळली; 2 ते 3 कामगारांचा मृत्यू