दहीहंडी उत्सवानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरात दहीहंडी उत्सवानिमित्त सायंकाळी पाच वाजल्यानंतर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहतुकीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस यांनी केले आहे.
शहरात मध्यवर्ती भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्त्यावर सायंकाळी पाच वाजल्यापासून दहीहंडी फुटेपर्यंत बुधवार चौक ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक (बाबू गेणू चौक), साहित्य परिषद चौक, नवी पेठ याठिकाणी भाविकांची गर्दी होते. त्यावेळी या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.