Devendra Fadnavis On Pune Rain Update Google
ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याने 'या' परिसरात दिला रेड अलर्ट, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं सतर्क राहण्याचं आवाहन

मागील आठवड्यात पुण्यात मुसळधार पाऊस पडल्यानं पूरस्थिती निर्माण झाली होती. अशातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा पुणे, पिंपरी, चिंचवड आणि आसपासच्या परिसरात रेड अलर्ट जारी केला आहे.

Published by : Naresh Shende

Devendra Fadnavis Tweet: गेल्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलच झोडपलं आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मागील आठवड्यात पुण्यात मुसळधार पाऊस पडल्यानं पूरस्थिती निर्माण झाली होती. अशातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा पुणे, पिंपरी, चिंचवड आणि आसपासच्या परिसरात रेड अलर्ट जारी केला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवर माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस ट्वीटरवर काय म्हणाले?

महत्त्वाची अपडेट : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेडअलर्ट जारी केला आहे. खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने सध्या 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाऊस आणखी वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती शक्यता गृहित धरुन स्वत: सिंचन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पुणे विभागीय आयुक्तांना संपूर्ण स्थितीची माहिती दिली आहे.

सर्व जिल्हाधिकार्‍यांशी सुद्धा सिंचन विभाग संपर्कात असून, जिल्हाधिकार्‍यांना लष्कर आणि एनडीआरएफ इत्यादी यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सर्वच विभाग समन्वयाने स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. तथापि नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news