भाजपासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे युती करणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. यातच आता शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले की, मनसेने कोणासोबत जायचं हे राज ठाकरे ठरवतील. राज ठाकरे हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यांनी कुणासोबत जावं हा त्यांचा निर्णय आहे. पण ते आमच्यासोबत आले तर वेलकम. आमच्या सर्व नेत्यांनी त्यांना सन्मानाने आमच्यासोबत येण्याचं आवाहन केलं आहे. पण शेवटी निर्णय राज ठाकरे यांचा आहे. ते काय निर्णय घेतील हे कुणीही सांगू शकत नाही. असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे सुद्धा शिंदे यांच्यासोबत रत्नागिरीत आले आहेत. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.