ताज्या बातम्या

ICICI बँक कर्ज घोटाळा प्रकरण; कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर

ICICI बँक कर्ज घोटाळा प्रकरण; कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर

Published by : Siddhi Naringrekar

ICICI बँक कर्ज घोटाळा प्रकरणात कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर झाला आहे. 1 लाखांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले. सीबीआयची कारवाई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवली आहे. आयसीआयसीआय बँक घोटाळ्याप्रकरणी चंदा आणि दिपक कोचर यांच्या याचिकेवर हायकोर्टाने आज निकाल जाहीर केला.

2009 ते 2011 दरम्यान, आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला नियम धाब्यावर बसवून कर्ज दिलं होतं. हे कर्ज देणाऱ्या समितीमध्ये चंदा कोचर यांचाही समावेश होता. यापूर्वी ईडीने 3000 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या आरोपांनंतर त्यांना 2018 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या कर्जाच्या बदल्यात व्हिडिओकॉनच्या प्रवर्तकांनी चंदा कोचर यांच्या पतीला कोट्यवधी रुपये दिल्याचा सीबीआयचा आरोप करण्यात आला होता.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी