छ. संभाजीनगर : राज्यात ओळखल्या जाणाऱ्या काही प्रमुख IAS अधिकाऱ्यांपैकी एक असलेले सुनील केंद्रेकर यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. केंद्रकरांच्या या निर्णयमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
राज्यातील काही मोजक्या धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत केंद्रेकरांच्या नावाची नेहमी चर्चा असते. विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त आणि आता विभागीय आयुक्त पदावर त्यांनी काम केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्यात केंद्रेकर नेहमी चर्चेत राहिले आहेत.