थोडक्यात
तरूणीचा बॉम्ब शब्दाचा उल्लेख: हैदराबाद विमानतळावर २० वर्षीय तरूणीने बॉम्ब शब्दाचा मजेशीर उल्लेख केला.
सुरक्षा यंत्रणेचा अलर्ट: बॉम्ब शब्द ऐकल्यानंतर सुरक्षा यंत्रणा त्वरित अलर्ट झाली.
तपासणी आणि परिणाम: सुरक्षा रक्षकांनी तरूणीला तात्काळ बाजूला केले, ज्यामुळे विमानतळावर गोंधळ उडाला.
मस्करीत बॉम्ब शब्दाचा उल्लेख करणं महिलेला चांगलंच महागात पडलंय. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका तरूणीने बॉम्ब शब्दाचा उल्लेख केला आणि त्यानंतर विमानतळावर खळबळ उडाली.
एक २० वर्षीय तरूणी गोव्याला जाण्यासाठी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तरूणीची विमानतळावर तपासणी सुरू असताना मेटल डिटेक्टर यंत्राने आवाज केला. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी अधिक तपासणी करायची असल्याचे म्हटले. सुरक्षा रक्षकांनी खबरदारी घेतल्यामुळे सदर तरूणीने माझ्याकडे बॉम्ब आहे का? असा टोमणा मारला. मात्र बॉम्ब या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आणि तात्काळ सदर तरूणीला बाजूला करण्यात आले.