महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद गोसावी, बोर्ड अध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. १५४ विषयाची परीक्षा घेण्यात आली होती.
गेल्यावर्षी पेक्षा यंदाचा निकाल दोन टक्क्यांनी घटला असून 154 विषयापैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा 96.01तर सर्वात कमी निकाल मुंबईचा 88.13 लागला आहे.
यावर्षी देखिल बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के तर मुलांचा निकाल 89.14 टक्के लागला आहे. शून्य टक्के निकाल लागलेल्या कॉलेज 17 आहेत. 2 हजार 369 कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे.
विभागानुसार टक्केवारी
- कोकण 96.01
- पुणे - 93.34
-कोल्हापूर 93.28
- अमरावती 92.75
- छत्रपती संभाजीनगर 91.85
- नाशिक 91.66
- लातूर 90.37
- नागपूर 90.35
- मुंबई 88.13
एकूण विद्यार्थी 14 हजार 16 हजार 371
त्यातील उत्तीर्ण 120लाख 92 हजार 468