लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज गुरुवारी लोकशाही संवाद कार्यक्रम मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडत आहे.
यावेळी राहुल नार्वेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत आहेत. तुम्ही अचानक तुमचा दौरा सोडून थेट मुंबईत कसे आलात?
यावर उत्तर देताना नार्वेकर म्हणाले, मला वारंवार विचारण्यात आले तुम्ही आधी का आलात तर मी आधी आलो नाही. जपानला एक अत्यंत यशस्वी दौरा पूर्ण करुन मी इकडे आलो आहे. माझा नियोजित दौरा हा 18 तारखेपर्यंतच होता. तिकडचे महत्वाचे कार्यक्रम पूर्ण करुन मी इकडचे महत्वाचे कार्यक्रम करायला आलो. असे राहुल नार्वेकर म्हणाले.