इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. तर कधी हरवलेल्या वस्तू किंवा व्यक्ती सापडण्याच्या घटना ही घडतात. मात्र, जर्मनमध्ये एका व्यक्तीला हिंदू पंचांग सापडलं आहे. जर्मन व्यक्तीला देवनागरी लिपीतील असलेले हे पुस्तक नेमकं आहे तरी काय हे जाणून घ्यायचं होतं म्हणून त्याने कुतूहुलाने नेटवर्किंग साईट रेडिटवर शेअर केले आहे.
एका जर्मन व्यक्तीने अलीकडेच रेडीटवर देवनागरी लिपीतील मजकूर असलेल्या कागदांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे कागद त्याला हॅम्बर्गमधील एका फ्ली मार्केटमध्ये सापडले. या छायाचित्रांमध्ये हिंदी किंवा संस्कृत मजकूर असलेली दोन पिवळसर पाने दिसत आहेत. या वापरकर्त्याने मजकूराचा उगम आणि अर्थ समजून घेण्यासाठी रेडिट (Reddit) समुदायाकडे मदतीची विनंती केली. त्यामुळे अनेक भारतीयांनी यावर प्रतिक्रिया देत, आश्चर्य व्यक्त केले आहे.
नेमकं काय घडलं?
हॅमबर्ग, जर्मनीमधील एका फ्ली मार्केटमध्ये एका व्यक्तीला काहीतरी आश्चर्यकारक वस्तू सापडली. या वस्तूविषयी जाणून घेण्यासाठी त्याने रेडिटचा आधार घेतला. या रेडिट पोस्टची इंटरनेटवर तुफान चर्चा झाली. एका ऑनलाइन वापरकर्त्याने शेअर केले होते की त्याला खरेदीच्या ठिकाणी काय भेटले हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. इंटरनेट प्लॅटफॉर्मवर त्याच्या शोधाची काही छायाचित्रे शेअर करत, त्याने भारतीयांना विचारत लिहिले, "हे हॅम्बर्ग, जर्मनीमधील फ्ली मार्केटमध्ये सापडले. तुम्ही मला सांगू शकाल का ते काय आहे?"
इंटरनेटवर शेअर केलेल्या प्रतिमांनी हे देवनागरी लिपीत लिहिलेले प्राचीन दस्तऐवज असल्याचे सूचित केले आहे. हे व्हिंटेज म्हणजे जुन्या पिवळसर कागदावर छापलेले संस्कृत मजकूर असल्याचे दिसून आले, जे पंचांगसारखे होते. त्या व्यक्तीच्या पोस्टवर अनेक युझर्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.