गुजरात निवडणुकीचा निकाल 2022 चा आज निकाल लागत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजप गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे कल आता हाती येत आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10,000 सुरक्षा कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतमोजणी सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 27 जागांवर आघाडीवर आहे. तर तीन जागांवर इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. त्या ठिकाणी बहुमताचा आकडा 35 चा आहे. सध्या विचार केला तर काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला आहे. मात्र, अद्याप संपूर्ण निकाल हाती आलेला नाही. काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारते हे पाहणं महत्वाचं आहे.