Crime News Team Lokshahi
ताज्या बातम्या

वाहने पंक्चर करून, महामार्गावर दरोडा घालणारी अट्टल कुख्यात टोळी जेरबंद

महामार्गावरील वाहने पंक्चर करून नागरिकांना लुटायचे

Published by : Team Lokshahi

भूपेश बारंगे

नागपूर-अमरावती महामार्गावर शेगाववरून भंडाराकडे उमेश भैयालाल उरकुडे हे आपल्या कारने पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास अमरावती नागपूर महामार्गावरील चक्रीघाट सारवाडी गावाजवळ अज्ञात आरोपीने कार समोर खिळ्याची लाकडी पट्टा टाकून कार पंचर करण्यात आली. कारमधील इसम वाहनाच्या खाली उतरताच त्याला काठीने मारहाण करण्यात आली.तर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व नगदी रक्कम जबरीने लुटण्यात आली.

याप्रकरणी तळेगांव (श्या.प) पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सात एप्रिलच्या रात्री आकीब खान उस्मान खान रा.वणी जिल्हा यवतमाळ यांचे कार क्र महा. 29 एडी 5708 ने नागपूर ते वणी जात असताना हिरडी फाट्याजवळ अज्ञात इसमाने रस्त्यावर खिळ्याची लाकडी पट्टा टाकून त्यांची कार पंचर केली.त्यानंतर त्यांना अडवून काठीने मारहाण व जखमी करुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व नगद रक्कम जबरीने चोरून नेला. त्यांनी याबाबत समुद्रपूर पोलिसात तक्रार दाखल केली.

वर्धा जिल्ह्यात महामार्गावर लुटण्याचा घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी स्थानिक गुन्हा शाखेची चमुला निर्देश देऊन चोरट्याचा शोध घेण्यात आला. वरील दोन घटना समोर येताच कैलास भिवसेन जाधव रा.अशोक नगर, नाशिक हे त्यांच्याकडील कारने इंदोरकडून धुळे कडे पहाटे चार वाजताच्या सुमारास जात असताना बाभाळे फाट्याजवळ कोणीतरी अज्ञात इसमाने रस्त्यावर खिळ्याची लाकडी पट्टा टाकून त्यांची कार अडवून त्यांना काठीने मारहाण व जखमी करण्यात आली.

त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व नगदी रुपये जबरीने लुटण्यात आले.याबाबत पोलीस स्टेशन सिंदखेड येथे तक्रार दाखल करण्यात आली. वरील तिन्ही घटना एक सारख्या असल्याने एकाच टोळीचे हे काम असल्याचा अंदाज पोलिसांना आला. त्याच अनुषंगाने पोलिसांनी आपले चक्र फिरववून गुप्तमहितीच्या आधारे पोलिसांना सुगावा मिळाला. अश्या प्रकारची चोरी,गुन्हे करणारी टोळी उस्मानाबाद येथे सक्रिय झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली.

गोपनीय माहितीवरून त्यांच्याकडे सिल्व्हर रंगाची कार व बोलेरो गाडीचा वापर करून महामार्गावर नागरिकांना लुटत असलेली टोळी नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथे असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी सापळा रचून टोळीच्या ताब्यातील सिल्व्हर रंगाची कार एसयूव्ही500 ,कार क्र.महा.25 आर 3927 व बोलेरो क्र.महा13एसी8082 अत्यंत शिताफी ने ताब्यात घेतली.चोरट्याना ताब्यात घेऊन त्यांचे नाव बबलू अप्पा शिंदे वय 28 वर्ष रा.खामकरवाडी, दत्ता सुंदर शिंदे वय 35 रा.तेरखेडा ,अमोल आप्पा शिंदे वय 32 रा.खामकरवाडी, सुनील लहू काळे वय 22 वर्ष रा.कोठवळी ,महादेव अन्सार काळे वय 24 रा. खामकरवाडी, सर्जेराव टात्याजी शिंदे वय 25 कोठावळी, लहू राजेंद्र काळे वय 45 रा.कोठावळी, उत्तम सुंदर शिंदे वय 50 रा. खामकरवाडी , विकास संजय शिंदे वय 21 वर्ष रा.तेरखेडा सर्व नऊ जण वाशी व कळब तालुक्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले.

या आरोपी मध्ये भावाभावाचा बापलेकाचा समावेश आहे. यातच त्यांच्या कुटुंबातील महिलांचा समावेश असण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून त्यांना मात्र अद्यापही पोलिसांनी अटक केली नाही.त्यांच्याकडून 24 लाख 69 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील आरोपी वाहने वापरून दरोडा व जबरी चोरी करण्याची यांना सवय असल्याचे सांगण्यात येते.त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.

याप्रकरणात पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, परिविक्षाधीन पोलीस अधिकारी शफकत आमना ,उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, दिनेश कदम, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि महेंद्र इंगळे, अमोल लगड, राम खोत, प्रमोद जांभूळकर, संतोष दरगुडे , निरंजन वरभे, गजानन लामसे, नरेंद्र डहाके, हमीद शेख, चंदू बुरंगे, राजेश तिवस्कर ,अमोल ढोबाळे, मनीष कांबळे ,यशवंत गोल्हर, प्रमोद पिसे, रणजित काकडे,श्रीकांत खडसे, राजेश जैयसिंगपुरे, गोपाल बावणकर, रितेश शर्मा, अभिजित वाघमारे, नितेश मेश्राम , अविनाश बनसोड, संजय बोगा, अनिल कांबळे , संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टणकर, निलेश कट्टाजवार, अक्षय राऊत , अंकित जिभे, अरविंद येनूरकर, वैभव चरडे, रवी पुरोहित, अमोल चौधरी, शाहिद सैय्यद ,स्मिता महाजन यांनी कारवाई केली.

वाहनधारकांना लुटणाऱ्या टोळीला फिल्मी स्टाईलने अटक

वर्ध्यातील महामार्गावर वाहनधारकांना लुटणाऱ्या दोन घटना घडताच पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. जिल्ह्यात दरोड्याच्या व लुटणाऱ्या घडत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते यातच याच आठवड्यात दोन ठिकाणी वाहन पंचर करून वाहनातील नागरिकांना लुटले याच घटनेतील आरोपीचे माहीती वर्धा स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता त्यांनी चोरट्यांना फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडण्यात आले.

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु