लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. हिंगोली लोकसभेसाठी शिवसेनेकडून खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांची उमेदवारी रद्द होऊन बाबुराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन आता प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर हेमंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हेमंत पाटील म्हणाले की, एकतर उमेदवारी जाहीर करायला नको होती. परंतु ठिक आहे पक्षाने उमेदवारी जाहीर केली. वरिष्ठांच्या, पक्षश्रेष्ठींच्या काही अडचणी असतात तीन पक्षांचे एकत्रित हे सरकार चालते आहे. काही तडजोडी असतात.
तसेच ते पुढे म्हणाले की, हे करत असताना एक त्यांचा जवळचा सहकारी या नात्याने मला त्यांनी सांगितले की काही अडचणी आहेत. काही गोष्टी आपल्याला स्विकाराव्या लागतील. निश्चित थोडसं वाईट तर वाटतंच परंतु एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे. आणि निश्चित ही जागा निवडून आणण्यासाठी मदत करणार. असे हेमंत पाटील म्हणाले.