India Meteorological Department: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. काही भागात नद्या-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच हवामान विभागाने (IMD) पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. आयएमडीने कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या काही तासात कोकण किनारपट्टी, कोकण घाटमाथा येथे काही ठिकाणी 200 एमएम ते 500 एमएम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहान करण्यात आलं आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, उद्या देखील पावसाचा जोर राहणार आहे. कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचा इशारा दिल्याने मुंबई कोकण विभागात येत असल्यानं मुंबईकरांनाही सतर्क राहावं लागणार आहे. मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यास जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणत्याही सूचना दिल्या नाहीत.
मुंबईत ऑरेंज अलर्ट
ठाणे, पालघर, जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणार अतिमुसळधार पाऊस
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
सातारा जिल्ह्यालाही रेड अलर्ट
सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात ही मुसळधार पाऊस कोसळणार, ऑरेंज अलर्ट जारी