आजही मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत काल 100 मीमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड आणि ठाण्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गोव्यात आज ऑरेंज अलर्ट जारी केला असुन संभाव्य पूर येण्याचा इशाराही दिला आहे.
मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे आता सखल भागात पाणी साचल्याचं दिसत आहे. दादर, कुर्ला, परळ परिसरात जोरदार पाऊस सध्या सुरु आहे. घाटकोपर,अंधेरी, बोरिवली भागात दमदार पावसाची हजेरी लावली आहे.
ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये संततधार पाऊस आहे. पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता आहे. तर मुंबईत काल 100 मीमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.