ताज्या बातम्या

Mumbai Rain: मुंबईत पावसाची दमदार हजेरी; 'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज

Published by : Dhanshree Shintre

मुंबईत रविवार, सोमवार मुसळधार पावसाचा तर ठाणे, पालघर भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत फारसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शनिवारी पहाटेपासून पडलेल्या पावसाने मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याची जाणीव मुंबईकरांना झाली. शहरापेक्षा उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. पहाटेपासून बोरिवली, मालाड, अंधेरी परिसरात जोरदार पाऊस कोसळत होता. दुपारनंतर दादर, वरळी, घाटकोपर परिसरात मुसळधार पाऊस झाला.

तसेच पालघर, ठाणे, रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी, हवामान संस्थेने 26 ऑगस्टपर्यंत 'यलो' अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार मुंबईत कालपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली तसेच आज सकाळ पासून मुंबईत जोरदार वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईच्या सायन, दादर, माहिम, माटुंगा ते कुलाबा परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने 25 आणि 26 ऑगस्ट रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. येत्या तीन, चार दिवस सर्वच भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे.

पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या शक्यतेसह सामान्यतः ढगाळ आकाश. अधूनमधून वादळी वारे 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 30°C आणि 25°C च्या आसपास राहील.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा