Gyanvapi Masjid Controversy Team Lokshahi
ताज्या बातम्या

ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी पूर्ण, 12 सप्टेंबरला निकाल

Published by : Shubham Tate

Gyanvapi Masjid Controversy : शृंगार गौरी ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणी न्यायालयाने 12 सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता 12 सप्टेंबरला निकाल सुनावण्यात येणार आहे. ज्ञानवापी खटल्याच्या सुनावणीदरम्यान औरंगजेबचीही एन्ट्री झाली आहे. कागदपत्र मागितल्यावर मशिदीच्या बाजूने मशिदीची जमीन औरंगजेबाची मालमत्ता असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी मुस्लीम बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज हिंदू बाजू आक्षेपावर उत्तर दाखल करणार आहे. (hearing in gyanvapi masjid case completed court)

यापूर्वी वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी मशिदीच्या बाजूने सतत पुढील तारीख मागितल्याने संतप्त झाले होते. कठोर भूमिका घेत त्यांनी 22 ऑगस्ट ही पुढील तारीख निश्चित केली आणि अंजुमन इनाजानियाला 500 रुपयांचा दंड ठोठावला. पुढच्या तारखेला म्हणजे गेल्या २२ ऑगस्टला पूर्ण तयारीनिशी येण्याच्या सूचना दिल्या होत्या. या प्रकरणाची सुनावणी 18 ऑगस्ट म्हणजेच गुरुवारी निश्चित करण्यात आली होती. मागील तारखेलाही अंजुमन इंसंजारिया मस्जिद कमिटीने मशिदीकडून १५ दिवसांचा वेळ मागितला होता. अधिवक्ता अभयनाथ यादव यांच्या आकस्मिक निधनामुळे तयारी पूर्ण झालेली नाही, असे वेळ मागण्याचे कारण सांगण्यात आले.

सलमाच्या जीवावर का उठला आहे लॉरेन्स बिश्नोई?

Manushi Chhillar: लॅक्मे फॅशन वीकमध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा कमाल लूक; एकदा पाहाच

Shrikant Shinde PWD अधिकाऱ्यांवर संतापले | Marathi News

Atul Parchure Passed Away : जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, मराठी कलाविश्वावर शोककळा

Shantanu Naidu: रतन टाटांची सावली म्हणून ओळखला जाणारा त्यांचा जिवलग, कोण आहे शंतनू नायडू?