ताज्या बातम्या

खारघर वासियांचे आरोग्य धोक्यात; मनसे आक्रमक

आम्ही सुंदर शहर बनवतो म्हणणाऱ्या सिडको प्रशासनाचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. खारघर वासियांना सुविधा न देता नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

Published by : Siddhi Naringrekar

हर्षल भदाणे - पाटील, नवी मुंबई

आम्ही सुंदर शहर बनवतो म्हणणाऱ्या सिडको प्रशासनाचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. खारघर वासियांना सुविधा न देता नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. खारघरमधील सेक्टर पंधरा- घरकुल, स्पॅगेटी, वास्तुविहार, सेलिब्रेशन, सेक्टर अठरा मुर्बी गाव आणि सेक्टर एकोणीस आदी वसाहतीत वाहणाऱ्या सांडपाण्यावर सिडकोने वास्तुविहार गृहनिर्माणशेजारी सांडपाणी प्रक्रिया केंद्र ( मलनिस्सारण केंद्र) उभारले आहे. परिसरातील सांडपाण्याचा निचरा व्हावा, यासाठी सिडकोने सदर केंद्रात आठ पंप उभारले होते. मात्र, त्यातील सहा पंप बंद असल्यामुळे सेक्टर पंधरा ते एकोणीस परिसरातील सोसायटीतील सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मलमिश्रित पाणी रस्त्यावर आल्याने रोगराई वाढली असून आजारी पडणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच या मल निस्सरण केंद्रालगतच तीन शाळा आहेत. सांडपाणी रस्त्यावर आल्याने मोठ्याप्रमाणात दुर्गंधीचा सामना नागरिक तसेच विद्यार्थ्यांना सहन करावा लगत आहे.

यावर मनसेचे पनवेल महानगर उपाध्यक्ष खारघर शहर गणेश बनकर यांनी या विरोधात ऑक्सीजन मास्क लावत स्ट्रेचरवर झोपून आंदोलन केले. यावेळी डॉक्टर, नर्स यांची टीम ही यावेळी आंदोलन स्थळी होती. उद्या अशीच परस्थितीचा सामना नगिरकाना करावा लागू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न मनसेकडून करण्यात आला. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या सिडको प्रशासनाला जाग यावी हाच उद्देश असल्याचे गणेश बनकर यांनी यावेळी सांगितले. लोकांच्या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे. सिडको पालिका प्रशासनाकडे बोट दाखवते तर पालिका ही सेवा आम्ही देत नाही म्हणून हात वर करते असा आरोप मनसेचे गणेश बनकर यांनी केला.

या आंदोलनाला 20 ते 25 सोसायटी आणि मलनिस्सारण केंद्रा लगत असणाऱ्या शाळेने हे केंद्र येथून हटवावे आणि सांड पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी म्हणत मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र आता प्रशासन काय भूमिका घेते यावर साऱ्यांचच लक्ष आहे. या आंदोलनावेळी मनसे पनवेल महानगर उपाध्यक्ष खारघर शहर गणेश वि.बनकर, माजी शाखाध्यक्ष खारघर भिमराव देशनेहरे , चंचला बनकर, दत्ता तंरगे, कुडलीक तिकोणे,रमेश जाधव,मंगेश पाटील,महेश पान्डे सर्व सोसायटीतील पदाधिकाऱ्यांसह व्यापारी उपस्थित होते.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती