ताज्या बातम्या

हसन मुश्रीफांचा भरसभेत जितेंद्र आव्हाडाबाबत गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये सभा घेतली

Published by : shweta walge

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये सभा घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा बीडमध्ये पार पडली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाडाबाबत गौप्यस्फोट केला आहे.

जितेंद्र आव्हाड हा भेकड माणूस आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडला होता आणि निवडणूक न लढण्याबाबत बोलला होता. एक गुन्हा दाखल झाला त्यामुळे असं वागला होता”, असे मुश्रीफ म्हणाले आहेत.

मुश्रीफ म्हणाले की, जयंत पाटील यांनी मला एक थक्क करणारे वक्तव्य सांगितले होते. एकदा ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते होते. दरम्यान यावेळी जयंत पाटील आणि अजित दादांना घेऊन आव्हाड अध्यक्षांच्या दालनात गेले होते. यावेळी तिथे तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांनी फडणवीस यांचे पाया पडले आणि सांगितले की विधानसभा निवडणूक लढवणार नाही. असा भेकड माणूस शरद पवारांच्या समोर वक्तव्य करतो आणि ते ऐकतात याचे आश्चर्य वाटते, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु