जम्मू-काश्मीर, हरियाणातील निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीर, हरियाणाचा कौल कुणाला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्बल 10 वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली.
कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.
तब्बल 10 वर्षांनंतर होणाऱ्या या विधानसभेच्या निवडणूकीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरसोबतच हरियाणामध्ये देखील काँग्रेसचाच बोलबाला पाहायला मिळत होता मात्र आता हरियाणामध्ये भाजपची जोरदार आगेकूच पाहायला मिळत आहे. हरियाणात भाजपकडून बहुमताचा आकडा पार झाला आहे.
सुरवातीच्या पिछाडीनंतर भाजपने जोरदार मुसंडी मारली असून भाजप 49 तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे.