जम्मू-काश्मीर, हरियाणातील निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीर, हरियाणाचा कौल कुणाला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्बल 10 वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली.
कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.
तब्बल 10 वर्षांनंतर होणाऱ्या या विधानसभेच्या निवडणूकीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता जम्मू काश्मीरसोबतच हरियाणामध्ये देखील काँग्रेसचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. हरियाणात काँग्रेसची लाट, भाजपची पिछेहाट आहे. सुरुवातीच्या कलानुसार हरियाणात काँग्रेसकडून बहुमताचा आकडा पार झाला आहे.
लोकसभेनंतरच्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले असून आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार हरियाणात भाजप 29, काँग्रेस 54 जागांवर पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला मोठा धक्का बसला आहे. यासोबतच जम्मू काश्मीरमध्ये 90 पैकी 88 जागांचे कल हाती आले कलांनुसार काँग्रेस बहुमताचा आकडा पार झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस 45 तर भाजप 33 जागांवर आहे. स्थानिक पक्ष पीडीपीला अवघ्या 06 जागा आहेत.