ताज्या बातम्या

हर्षवर्धन पाटलांचं शरद पवार गटात प्रवेश; अजित पवार म्हणाले...

Published by : shweta walge

राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीत विजयासाठी सर्व पक्षांनी आपली कंबर असली आहे. यातच भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाळीस आमदार आमच्याकडे आहेत मात्र काही जणांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ती घेऊ शकतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, चाळीस आमदार आमच्याकडे आहेत मात्र काही जणांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ती घेऊ शकतात. लोकशाही आहे, त्यामुळे कोणी इकडे तिकडे गेलं तरी आमच्याकडे हाउसफुल जागा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जागा कमी आहे, त्यामुळे ते घेण्याचा प्रयत्न करताय.

हर्षवर्धन पाटलाला असं वाटलं असेल किती जागा सेटिंग आमदारांना मिळणार त्यामुळे आपल्याला ती जागा मिळणार नाही. म्हणून प्रत्येकाला आमदार बनायचं आहे. प्रत्येकाला निवडून यायचे आहे त्यासाठी हर्षवर्धन पाटील तिकडे गेले असतील, असं ते म्हणाले.

तीन पक्षाचे मिळून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इच्छुक असतात सगळ्यांना जागा पाहिजे असतात त्यामुळे कोणी इकडे तिकडे गेले तरी आमच्याकडे जागा आमच्या फिक्स आहेत. पहिल्यापासून पाचव्या शक्तिपर्यंत सगळ्या शक्ती आता जागृत झालेल्या आहेत.

दरम्यान, इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया ताईंना मदत केली अस जाहीरपणे सांगितले यावर अजित पवार म्हणाले आता ती त्यांनी सांगितलं त्याला मी काय करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांनी सुनेत्र पवार यांच्यावर विजय मिळवत चौथ्यांदा लोकसभा गाठली होती. सुप्रिया सुळे यांच्या या विजयात इंदापूरकरांचा मोठा वाटा होता. त्यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून 25 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तर त्या एकूण 1 लाख 58 हजार मतांनी विजयी झाल्या होत्या.

सलमाच्या जीवावर का उठला आहे लॉरेन्स बिश्नोई?

Manushi Chhillar: लॅक्मे फॅशन वीकमध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा कमाल लूक; एकदा पाहाच

Shrikant Shinde PWD अधिकाऱ्यांवर संतापले | Marathi News

Atul Parchure Passed Away : जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, मराठी कलाविश्वावर शोककळा

Shantanu Naidu: रतन टाटांची सावली म्हणून ओळखला जाणारा त्यांचा जिवलग, कोण आहे शंतनू नायडू?