आज हनुमान जयंतीच्या व खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हनुमानाची मूर्ती बसवली जाणार त्याचे सँपल दिल्ली वरून नवनीत राणा व रवी राणा यांच्या घरी पोहोचलेल आहे. या हनुमान मूर्ती समोर आज सकाळी८.३०वाजता राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री समोर हनुमान चालीसा पठनाच्या मुद्द्यावरून राणा दाम्पत्यांना 14 दिवसाचा तुरुंगवास भोगावा लागला. 14 दिवस पर्यंत तुरुंगातही हनुमान चालीसाचे पठण केल्यानंतर ,उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर 111 फुटाची भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प राणा दाम्पत्यानी केला होता.
अमरावतीच्या छत्रीतलाव परिसरात दहा एकर जागे मध्ये देशातली भव्य अशी 111 फुटाची मूर्तीचे लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. तर आज होणाऱ्या हनुमान चालीसाचे आवाज मातोश्री संपूर्ण महाराष्ट्र पर्यंत पोहोचवू असे आमदार रवी राणा यांनी सांगितले.