ताज्या बातम्या

"माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी पाकिस्तानी पत्रकारांना 5 वेळा भारताची गुप्त माहिती दिली"

भाजपने हा आरोप करत काँग्रेसला धारेवर धरलं आहे.

Published by : Sudhir Kakde

पाकिस्तानी पत्रकाराच्या खुलाशानंतर भाजपने काँग्रेस (Congress) आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर आरोप करत काही सवाल उपस्थित केले आहेत. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितलं की, "पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी खुलासा केला की, तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्याला पाच वेळा भारतात आमंत्रित केलं होतं. भारत दौऱ्यावर असताना त्यांनी भेटण्यासाठी बोलावलं असता, संवेदनशील आणि अत्यंत गोपनीय माहिती दिली जात होती. आपण पाच वेळा भारताला भेट देऊन हमीद अन्सारी (Hamid Ansari) यांच्याकडून माहिती घेतली आणि ती भारताविरुद्ध वापरली. भारताला कमकुवत करण्यासाठी ही माहिती आयएसआयसोबत शेअर करण्यात आली होती. ही गोपनीय माहिती शेअर करायची हे काँग्रेस सरकारचं धोरण होतं का? देशातील जनतेनं अन्सारींना आदर दिला. त्या बदल्यात त्यांनी काय दिलं? काँग्रेस पक्षाने उत्तर देऊ नये का? 2010 मध्ये अन्सारी यांनी दयाळूपणे या पत्रकारांना दहशतवादाच्या चर्चासत्रात आमंत्रित केलं, मग भारताने दहशतवादाचा सामना कसा करावा?

हमीद अन्सारी हे इराणचे राजदूत होते. ते भारताच्याच सुरक्षेला छेद देत होते. माजी रॉ एजंटने हा खुलासा केला आहे. त्यांनी अशा व्यक्तींना गोपनीय माहिती दिली, ज्यांना ती द्यायला नको होती. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार नुसरत मिर्झा यांनी अलीकडेच त्यांच्या एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दावा केलाय की, ते 2005 ते 2011 दरम्यान अनेक वेळा भारतात आले होते. यावेळी त्यांनी असंही सांगितलं की, या दौऱ्यांमध्ये मी माहिती गोळा केली आणि ती पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ला पाठवली. तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांना सुमारे पाच वेळा भारतात आमंत्रित केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आपल्याला सर्वसामान्यांपेक्षा जास्त शहरांमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळत होती असंही त्यांनी सांगितलं आहे.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news