कोरोनाने कुठे विश्रांती घेतलेली असताना सर्व नीट सुरू झालेले असताना आता नवीन व्हायरसने एन्ट्री घेतली आहे. H3N2 हा व्हायरने आता पुण्यात धडक दिली आहे.
पुण्यात H3N2 चे 22 रुग्ण आढळले आहेत. तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. H3N2 इन्फ्लूएंझा हा नवा विषाणू देशात वेगाने पसरतोय. तेव्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा तसंच काळजी घ्या असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
H3N2 विषाणू संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे 19ते 60 वयोगटातील असल्याची माहिती मिळत आहे.