आज सोमवारी (24 जुलै) वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार एएसआयचं पथक सर्वेक्षणासाठी मशिदीच्या परिसरात दाखल झालं होतं. मात्र सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी सर्वेक्षण पथकाला सकाळी 11.15 वाजता कोर्टात हजर राहून सर्वेक्षणाची माहिती देण्यास सांगितली होती. यावेळी सुप्रीम कोर्टाने ज्ञानवापी मशिदीतील सर्व्हेला 26 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्थापनावर देखरेख करणाऱ्या अंजुमन समितीने सर्व्हेविरोधात याचिका दाखल केली होती. आता सुप्रीम कोर्टाने ज्ञानवापी मशिदीतील सर्व्हेला 26 जुलैपर्यंत स्थगिती दिली असून परिसरात दोन आठवडे कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये, असं देखील सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे.
आम्हाला अपील करण्याची संधी मिळाली नाही आणि त्याआधीच सर्वेक्षण सुरू झालं. खोदकामासंदर्भातील आदेश असल्यास आम्हाला दाद मागण्याची संधी मिळावी असं अंजुमन समितीतर्फे वरिष्ठ वकील हुजैफा अहमदी म्हणाले.