ज्ञानवापी मशिदीसंदर्भात अलहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मुस्लिम पक्षाने या सर्वे विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. “न्यायालयाने सर्वेला मंजुरी दिली आहे. ASI ने आपलं प्रतिज्ञापत्र दिलय. न्यायालयाचा आदेश आलाय. त्यामुळे आता काही प्रश्न नाही. असं हिन्दू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी म्हटले आहे.
यकोर्टाने परिसरात ASI चा सर्वे सुरु ठेवण्याचे निर्देश दिले.हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर ज्ञानवापी मशीद परिसरात तात्काळ सर्वे सुरु होणार आहे.